‘ती’ संशयित गाडी दिसली आणि तरुणांसह पोलिसांनी पाठलाग करून चोरट्यांना पकडले

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 15 जून 2021 :-  जिल्ह्यात गुन्हेगारी चांगलीच फोफावत आहे. यातच जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात देखील चोऱ्यांचे सत्र वाढल्याने नागरिक जागरूक होऊ लागले आहे. नुकतेच सोनई बसस्थानक परिसरात चार संशयित आढळून आले.

परिसरातील तरुणानं त्यांची शंका आली, आपले पितळ उघडे पडणार या भीतीने ते गाडी घेऊन पळू लागले. मात्र ग्रामसुरक्षा दलाचे युवक व पोलिसांनी चारपैकी तिघांना मोरया चिंचोरे शिवारात पाठलाग करुन ताब्यात घेतले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, आठ दिवसांपासून सोनईत चोरट्यांच्या धुमाकूळ सुरु होता. दरम्यान 4 दिवसांपूर्वी गावातील दिडशे तरुणांनी ग्रामसुरक्षा दल स्थापन करुन पोलिसांच्या बरोबरीने रात्रीची गस्त सुरु केली होती.

यावेळी ग्रामस्थांच्या सांगण्यावरुन निळ्या रंगाची एक टाटा सफारी मोटार संशयाच्या फेर्‍यात होती. हीच मोटार सोमवारी (ता.14) सकाळी 9.30 वाजता एका युवकाने बसस्थानक परीसरात बघितली. एकमेकांना संपर्क करण्यात आला.

युवकांच्या हालचाली लक्षात आल्यानंतर संशयित मोटारीत बसून नव्या वांबोरी रस्त्याने गेले. ग्रामसुरक्षा दलाच्या युवकांसह पोलीस पथकाचा ताफा मागून निघाला. मोरया चिंचोरे शिवारातील एका शेतात मोटार (ए.पी.04, सी.जी.2007) लावून सर्व संशयित उसाच्या शेतातून पळत असताना पोलीस व युवकांनी पाठलाग करून तिघांस ताब्यात घेतले.

अन्य एकाचा शंभरहून अधिक युवक व पोलीस यंत्रणा शोध घेत आहेत. पोलिसी खाक्यानंतर त्यांची नावे व हेच सोनईतील चोर्‍यांशी संबंधित आहेत की नाही हे निष्पन्न होईल.

दरम्यान हे डिझेल चोरी प्रकरणातील असल्याची माहिती समोर येते आहे. या प्रकरणात आणखी तिघांना ताब्यात घेतल्याने त्यांची संख्या सहा झाली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24