अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2021:- सध्या राज्यात मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. जिल्ह्यात देखिल सतत रुग्ण वाढत आहेत, त्यामुळे सावधगिरीची खूप गरज आहे. दरम्यान श्रीरामपूर तालुक्यातील एका शाळेतील विद्यार्थीनी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली.
त्यामुळे शाळा आठ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्या असल्याची माहिती गट शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली. यामुळे ग्रामस्थांनी आठवडेबाजार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
श्रीरामपूर तालुक्यात आतापर्यंत सात कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्या विद्यार्थीनीचे आजोबा नगर येथील एका रुग्णालयात कोरोनाचे उपचार घेत आहेत.
त्यामुळे कुटुंबीयांच्या संपर्कात आल्याने तिची तपासणी करण्यात आली असता या तपासणीत ती पॉझिटिव्ह आढळली. त्यामुळे शाळेने तातडीने बैठक घेऊन शाळा आठ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तिची तपासणी करण्यात आली त्यावेळी शाळा बंद होती. त्यामुळे अन्य कोणालाही ठरण्याची भीती नाही तर पालकांची संमतीपत्र घेऊन विद्यार्थ्यांची एक करून तपासणी करण्यात येणार आहेत.