अहमदनगर Live24 टीम, 1 ऑगस्ट 2021 :- ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य, पोलिस पाटील व देवस्थानच्या विश्वस्तांचा समावेश अहमदनगर : नेवासा तालुक्यातील वरखेड देवी यात्रा भरवणे येथील गाव कारभाऱ्यांना चांगलेच महागात पडले आहे.
येथील श्रीमहालक्ष्मी देवी विश्वस्त मंडळ, ग्रामपंचायत पदाधिकारी व पोलीस पाटलासह तब्बल २४ जणांवर नेवासा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कोरोनाबाबतचे जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन करीत यात्रेची गर्दी झाल्याबद्दल वरखेडच्या महालक्ष्मी देवी मंदिर समितीचे उपाध्यक्ष व विश्वस्त सदस्य,
गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील यांच्यासह देवस्थान विश्वस्त मंडळासह एकूण २४ जणांवर गुन्हा झाला आहे. कोरोना प्रतिबंधात्मक आदेश लागू असतानाही यात्रा भरून भाविकांची गर्दी करत, देवीला नैवेद्य म्हणून सातशे ते आठशे बोकड बळी दिले.
कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी देवी यात्रा भरु न देणे तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव टाळणे अपेक्षीत असतानाही त्याकडे दुर्लक्ष करुन यात्रा भरवून गर्दी जमा केली.
म्हणून श्री महालक्ष्मी देवी ट्रस्ट मंडळाचे उपाध्यक्ष व विश्वस्त सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचाय त सदस्य व पोलिस पाटील यांच्याविरुध्द नेवासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.