अहमदनगर Live24 टीम, 5 ऑगस्ट 2021 :- पुण्यात एका १७ वर्षीय मुलीचं त्याच्यावर प्रेम जुळलं अन् त्यांनी कुटुंबाचा विरोध पत्करत मंदिरात लग्नही केलं. काही कालावधीनंतर ती गर्भवती राहिली. पण, प्रियकराच्या मावशीने गोळ्या देऊन तिचा गर्भपात केला.
तर दुसऱ्या वेळेस गर्भवती राहिल्यानंतर प्रियकरानेच तिला ‘हे माझं मूलं नाही’ म्हणत घरातून हाकलून देत माहेरी पाठविल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी प्रियकर प्रतिक दळवी (वय २०) व त्याच्या मावशीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अल्पवयीन मुलीने स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांची ओळख झाली होती. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. त्याने लग्न करण्याचे आमिष देखील तिला दाखविले. पण दोघांच्या घरच्यांचा लग्नाला विरोध होता.
यावेळी त्या दोघांनी पळून जात मंदिरात लग्न केले. त्यानंतर अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली. त्यामुळे तिच्या कुटुंबाने पुन्हा या दोघांचे लग्न लावून दिले. त्यानंतर मुलगी प्रियकरासोबत त्याच्या घरी राहत होती.
यावेळी प्रियकराच्या मावशीने गोळ्या देऊन गर्भपात केला. त्यानंतर काही महिन्यांनी मुलगी पुन्हा गर्भवती राहिली. त्यावेळी प्रियकराने ‘ते मूल माझे नाही’, असे म्हणत
तिला घरातून बाहेर हाकलत माहेरी पाठविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मुलीने तक्रार दिल्यानंतर दोघांवर बलात्कार, पॉस्कोसह बाल विवाह कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.