अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- शेवगाव तालुक्यातील कोविड सेंटरसाठी 24 तर पाथर्डी तालुक्यातील कोविड सेंटरसाठी 23 असे 47 रेमडिसीवीर इंजेक्शन रविवार दि. 23 मे रोजीसाठी मिळाले आहेत.
रेमडिसीवीर इंजेक्शनचा होणारा काळाबाजार रोखण्यासाठी प्रशासनामार्फत या इंजेक्शनचे वाटप करण्यात येते आहे. जिल्ह्यासाठी आलेल्या रेमडिसीवीर इंजेक्शनचे वाटप ऑक्सिजन किंवा आयसीयू बेड संख्यानुसार समप्रमाणात करण्यात येते.
त्याप्रमाणे कोविड-19 बाधित रुग्णांवर उपचार करण्याकरिता पाथर्डी तालुक्यातील खाजगी हॉस्पिटल व कोविड सेंटर करिता एकूण 23 व शेवगाव तालुक्यातील खाजगी हॉस्पिटल व कोविड सेंटर करिता एकूण 24 असे एकुण 47 रेमडिसीवीर इंजेक्शन मंजूर झाले आहेत.
पाथर्डीसाठी 23 इंजेक्शन :- पाथर्डी तालुक्यातील गर्जे हॉस्पिटल 08, ज्ञानेश्वर माऊली हॉस्पिटल 05, पाथर्डी कोविड केअर सेंटर 02, तिसगाव येथील श्री कोविड केअर सेंटर 06, मिरी येथील दत्तप्रसाद कोविड केअर सेंटर 02 असे 23 रेमडिसिवीर इंजेक्शन मिळणार आहेत.
शेवगावसाठी 24 इंजेक्शन :- शेवगाव तालुक्यातील शेवगाव येथील आधार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल 03, अर्थव हॉस्पिटल 03, बडे हॉस्पिटल 03, साई कोविड सेंटर 03, बोधेगाव येथील बोधेश्वर कोविड सेंटर 02, शेवगाव येथील श्री संत एकनाथ आयुर्वेद रुग्णालय 03,
शेवगाव येथील फडके हॉस्पिटल 01, शेवगाव येथील साईपुष्प हॉस्पिटल 04, शेवगाव येथील डॉ. के. डी. कांबळे मेमोरियल हॉस्पिटल 01, शेवगाव शहरातील सेवा जनरल हॉस्पिटल कोविड सेंटर 01 असे 24 रेमडिसिवीर इंजेक्शन मिळणार आहेत