गावठी कट्टा बाळगणाऱ्या दोघांना शेवगाव पोलिसांनी केले गजाआड

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 8 सप्टेंबर 2021 :-  शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी गावच्या पुढे शेवगाव-गेवराई रस्त्यालगत गावठी कट्टा बाळगणाऱ्या एकाला शेवगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, शेवगाव-गेवराई रस्त्यालगत काही अज्ञात इसम हे गावठी बनावटीचा कट्टा खरेदी विक्री करण्या करिता येणार असल्याची माहिती शेवगाव पोलिसांना मिळाली होती.

त्या अनुषंगाने पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. सदर ठिकाणी दोन‌ पंचासह जावून गुप्त महितीतील ठिकाणी दोन इसम हे संशयित रित्या उभे असलेले पोलिसांना पाहून पळून जात असताना आढळून आले.

सदर दोन इसमाचा पाठलाग करुन डी बी पथकाने त्यांना शिताफीने पकडले. त्यांचे अंगझडतीत आरोपी राहुल हिम्मतराव शितोळे (रा बालमटाकळी ता.शेवगाव) यांचे कमरेला एक गावठी बनावटीचा कट्टा मिळून आला

तसेच दुसरा आरोपी कुमार भानुदास शिंदे (रा.पाणेवाडी ता.घणसांगवी जिल्हा जालना) यांचे अंगझडतीत दोन जिवंत राऊंड मिळून आले तसेच सदर आरोपींकडून दोन विनानंबरच्या दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या.

मोटारसायकल बाबत पोलिस हेडकॉन्स्टेबल प्रशांत नाकाडे यांनी आरोपींना विचारपूस केली असता सदर मोटारसायकल चोरीच्या असले बाबत आरोपींनी सांगितले. आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ahmednagarlive24 Office