शिर्डी बसस्थानक परिसर बनतोय चोरट्यांचा अड्डा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 7 एप्रिल 2021 :-गेल्या काही दिवसांपासून बसस्थानक परिसरात चोरट्यांच्या टोळ्या सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. या चोरट्यांकडून प्रवाश्याना टार्गेट केले जात असून त्यांना लुटण्याच्या घटना घडताना दिसून येत आहे.

मात्र निष्क्रिय पोलीस प्रशासनामुळे या चोरट्याने मनोबल उंचावत चालले आहे. मात्र याचा आर्थिक भुर्दंड सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागतो आहे.

नुकतेच भाविकांचे श्रद्धास्थान असलेले शिर्डीमध्ये उपचारासाठी आलेल्या एका महिलेच्या पर्समधून दागिन्यांची चोरी शिर्डी बसस्थानकात करण्यात आली.

याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, रुक्मिणी रघुनाथ फल्ले (वय 56) ही महिला तिच्या पतीसह वैजापूर येथून बसने उपचारासाठी शिर्डी बसस्थानकावर उतरल्या असता

शिर्डी बसस्थानकावर उतरल्यानंतर पर्समध्ये असलेले दोन तोळे सोन्याची मनी मंगळसूत्र व गंठण अज्ञात चोरट्याने चोरून नेले.

त्यानंतर महिलेने अज्ञात चोरट्याच्या विरोधात तक्रार दाखल केल्याने शिर्डी पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिर्डी बसस्थानकावर नेहमीच लहान-मोठ्या चोर्‍या होत असतात.

शिर्डी बसस्थानकावर असलेल्या सीसीटीव्हीद्वारे पोलिसांनी तपास करण्याची गरज आहे. मात्र गुन्हे शोध पथकातील पोलीस याकडे गंभीरपणे बघत नसल्याने या चोरट्यांचे धाडस वाढत आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24