शिर्डीकर संतप्त ! वीज कनेक्शन तोडण्याची कारवाई थांबवावी अन्यथा…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 23 जुलै 2021 :- आर्थिक परिस्थिती बिकट असतांंना महावितरण कंपनीने वीज वसुलीपोटी शिर्डी शहरात वीज कनेक्शन तोडण्याचा सपाटा लावला असून वीज कनेक्शन तोडण्याची कारवाई महावितरणने त्वरित थांबवावी अन्यथा याविरोधात उपोषणास बसणार असल्याचा इशारा

महावितरणचे उपकार्यकारी अभियंतापाटील यांना निवेदनाद्वारे शिर्डी नगरपंचायतीच्या नगरसेवकांनी दिला आहे. शिर्डी शहराची अर्थव्यवस्था करोना महामारीने ढासळली असून अनेक नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

साईमंदिर अजूनही भक्तांना दर्शनासाठी बंद आहे. त्यामुळे रोजगारही पूर्णपणे बंद आहे. शिर्डीकरांनी प्रामाणिकपणाने लाईट बिल भरण्यास सहकार्य केले आहे. सध्या कोविडमुळे मात्र नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

शिर्डीकरांचा सर्व व्यवसाय हा साई मंदिरावर अवलंबून आहे. व्यवसाय नसल्याने नागरिकांना दोन वेळचे जेवणाचे हाल होत आहेत. त्यातच वीज बिलापोटी वीज कनेक्शन बंद करण्यात येत आहे. ही कारवाई तत्काळ थांबवण्यात यावी.

मंदिर चालू झाल्यानंतर नागरिक वीज बिल भरणारच आहेत. वीज तोडणी तत्काळ थांबवली नाही तर उपोषणास बसण्याचा निर्णय या नगरसेवकांनी घेतला आहे.

निवेदनाच्या प्रती ऊर्जामंत्री नितीन राऊत, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, माजी मंत्री राधाकृष्ण विखे व वीज वितरण कपंनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविण्यात आल्या आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24