शिवसैनिक कधीही शरद पवारांच्या दावणीला बांधला जाणार नाही- दीपक केसरकर

मुंबई : शिवसेनेचे शिंदे गटाचे प्रवक्ते आणि आमदार दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर नारायण राणेंना शिवसेनेतून बाहेर पडण्यासाठी मदत केल्याचा आरोप केला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना दीपक केसरकरांनी शरद पवारांना टीकेचे लक्ष्य केले आहे.

मातोश्री कधी सिल्व्हर ओकच्या दारी गेल्याचं मी ऐकलेलं नाही. आपला पक्ष मोठा व्हावा, तो सत्तेत असावा ही शरद पवारांची इच्छा असणं स्वाभाविक आहे. पण बाळासाहेबांना हे कधीही मान्य नव्हतं. शिवसैनिक कधीही शरद पवारांच्या दावणीला बांधला जाणार नाही, असेही दीपक केसरकर म्हणाले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

मी राष्ट्रवादीत होतो, त्यावेळी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा शिवसेना फुटली तेव्हा त्यामागे शरद पवार होते ही वस्तुस्थिती आहे. त्यांनी शिवसेना का फोडली? बाळासाहेब जिवंत होते तेव्हा त्यांना यातना का दिल्या? याचं उत्तरही त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला दिलं पाहिजे, असे दीपक केसरकर म्हणाले आहेत.