अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :- गेल्या वर्षी जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. एवढेच काय तर जिल्ह्याती धरणे, तलाव , नद्या, बंधारे आदी तुडुंब भरून वाहिले.
एवढे सगळं असताना जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. यामुळे नागरिक चांगलेच हैराण झाले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नेवासा शहरातील सावतानगर उपनगरातील नगरपंचायतीच्या पाईपलाईनवर अनाधिकृत जोड दिल्याने
पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट झाल्याने येथील नागरीकांनी शिवसेना शहरप्रमुख नितीन जगताप यांच्या नेतृत्वाखाली नगरपंचायत मुख्याधिकार्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले.
शहरातील सावतानगर उपनगरात अनेक पाईपलाईनवर अनाधिकृत जोड आहेत.त्यामुळे येथील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
मुख्याधिकारी यांना जगताप व नागरीकांनी वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली. सात दिवसात आमचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर महिलांसह आंदोलन करण्यात येईल असे ते म्हणाले.
यावेळी मुख्याधिकारी अंबादास गर्कल यांनी आदोलकांचा पाण्याचा प्रश्न समाजावून घेवून सात दिवसात प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले.