ताज्या बातम्या

‘महाविकास आघाडीत शिवसेना संपली’ ! सेनेने महाविकास आघाडीतून बाहेर यावे…

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 03 ऑक्टोबर 2021 :-  भाजपने देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत पुन्हा एकदा आयाराम फॉर्म्युला वापरत शिवसेनेचे नाराज माजी आमदार सुभाष साबणे यांना पक्षात प्रवेश देण्यापूर्वीच उमेदवारी जाहीर केली आहे.

काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोना संसर्गामुळे निधन झाल्याने ही जागा रिक्त होती. सुभाष साबणे यांनी त्यानंतर नांदेड जिल्ह्यात अशोक चव्हाण यांच्या राजकारणामुळे शिवसेनेचे अस्तित्व संपत असल्याचे सांगत भाजपमध्ये प्रवेशाची घोषणा केली आहे.

सुभाष साबणे यांचा शिवसेना सोडताना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणीने कंठ दाटून आला. शिवसेनेतील आठवणी सांगताना सुभाष साबणे यांना अश्रू अनावर झाले.

काँग्रेसकडून सहा नावांचर चर्चा करून हायकमांडच्या निर्णयाची प्रतिक्षा केली जात असताना भाजपकडून धक्कातंत्राचा अवलंब करत सुभाष साबणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

१९८४ पासून शिवसेनेमध्ये काम करताना आमदारकी भुषविलेल्या साबणे यांनी भाजप प्रवेशाची घोषणा करताना पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या एकाधिकारशाहीला कंटाळून मला शिवसेना सोडावी लागत आहे.

शिवसेना सोडताना अतिशय वाईट वाटत आहे, असे सांगितले. ते म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांनी पण माझ्या कार्यकर्त्याला बुटाने मारण्याचा जो प्रकार झाला त्या मनाला वेदना देऊन गेल्या.

राज्यात काँग्रेस संपली होती. उद्धव साहेबांमुळे तुम्ही सत्तेवर आलात आणि तुम्ही आम्हाला विसरता? असा सवाल साबणे यांनी अशोक चव्हाण यांना केला.

आमच्या नेत्यांचे फोटो बॅनरवर देखील लावले जात नाहीत. त्यामुळे आमच्या कार्यकर्त्याने काळे झेंडे दाखवले तर त्यांना बुटाने मारण्याचा प्रयत्न झाला, असे साबणे म्हणाले. आमच्या सदस्यांना जिल्हा नियोजना मधून निधी दिला जात नाही, असा आरोप देखील त्यांनी केला आहे.

शिवसेना संपवण्याचा प्रयत्न नांदेड जिल्ह्यामध्ये अशोक चव्हाण करत आहेत. उद्धव ठाकरे हे सज्जन आहेत त्यांना डावपेच माहीत नाहीत.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मास्टर लोक आहेत. पायातपाय घालण्यात आणि राजकारणात हे पीएचडी झालेली माणस आहेत. शिवसेनेचे यामुळे नुकसान आहे असे साबणे म्हणाले.

Ahmednagarlive24 Office