Maharashtra : “शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधली आहे…”

Maharashtra : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या स्वातंत्रवीर सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर भाजप चांगलीच आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. तसेच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही राहुल गांधी यांच्या वक्तव्याचे समर्थन केले नाही.

भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधी यांच्याबरोबरच शिवसेनवरही निशाणा साधला आहे. ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी ज्या प्रकारे शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधली आहे, ते पाहता एक दिवस ते स्वतः सावरकरांबद्दल आज राहुल गांधी जे बोलतायत, तसंच वक्तव्य करतील असे म्हणत त्यांनी निशाणा साधला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

राहुल गांधी यांच्या वक्तव्यानंतर राज्यभरातून राहुल गांधी यांच्यावर टीका करण्यात येत आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनीही राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे.

बावनकुळे म्हणाले, राहुल गांधी आक्षेपार्ह वक्तव्य करतायात, त्याचं समर्थन काँग्रेस पक्ष करत आहे. स्वातंत्र्याचा इतिहास माहित असूनही तो दडपून टाकत काँग्रेसने आज आपली या देशाविषयी घृणा निर्माण केली आहे.

हा देश त्यांना कधी माफ करणार नाही. जनता त्यांना माफ करणार नाही. राहुल गांधींनी जे काही एक-दोन टक्के या यात्रेतून कमावलं होतं. ते या वक्तव्यानंतर गमावले आहे. असे बावनकुळे म्हणाले आहेत.

उद्धव ठाकरे यांच्यावरही चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली आहे. ते म्हणाले, राजीव गांधी यांच्या जयंती किंवा पुण्यतिथीला उद्धव ठाकरे आदरांजली वाहतात.

पण राहुल गांधी यांनी आज बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनी कुठेही त्यांच्या प्रतिमेचे पूजन केलेले दिसून आले नाही,तसेच ते आजच्या दिवशी बाळासाहेबांवर ४ शब्दही बोलले नाहीत.