अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :-राहुरी फॅक्टरी शिवसेना शहरप्रमुख विजय गव्हाणे यांचे फेसबुक हॅक करून मित्र परिवाराला गंडा घातल्याची घटना ताजी असतानाच राहूरी तालुका
शिवसेनेचे प्रमुख विजय बाबुराव ढोकणे यांचे फेसबुक अज्ञात व्यक्तीने हायजॅक केले असून, तो इसम ढोकणे यांच्या नावाने मेसेजद्वारे 10 हजार रुपये मदतीची मागणी करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
या घटनेची माहिती अशी की, शिवसेनेचे तालुका प्रमुख विजय ढोकणे यांचे फेसबुक खाते आहे.
त्यावरून अज्ञात व्यक्तीने रात्री 2 वाजता कारखान्याचे माजी संचालक सुनील अडसुरे यांना मेसेज टाकत मला 10 हजार रुपयांची गरज आहे, तरी तत्काळ पाठवावे ही विनंती केली, त्यावर अडसुरे हे हुशार असल्याने
त्यांनी दाल मे कुछ काला है ओळखत त्यांना पैसे देतो पण खाते नंबर सांगा असे विचारताच त्याने बनावट खाते नंबर पाठवून दिला, आता ही बनवा बनवी असल्याचे ओळखून अडसुरे यांनी त्याला खेळवले मात्र पैसे टाकले नाही, उलट सकाळी गावात ये आणि पैसे घेऊन जा, असे सांगितले.
त्यानंतर आज दुपारी पत्रकार गोविंद फूनगे याना विजय ढोकणे यांचा फेसबुक मेसेज आला व माझ्या मित्राच्या मुलीला उपचारासाठी 10 हजाराची गरज असून दोन तीन दिवसात परत देईल, पण एवढे पैसे टाक अशी भावनिक साद घातली,
मात्र पत्रकार यांनी बनावट प्रकरण ओळखून त्याची मजा घेतली, माझ्याकडे पैसे नाही असे सांगितल्यानंतर त्या व्यक्तीने तुमच्या बँक खात्यात किती पैसे आहेत, हे विचारले, त्यावर पत्रकार 200 रुपये असल्याचे सांगताच त्या व्यक्तीने मित्रांकडे उसने घ्या व मला पैसे पाठवा,
अशी विनंती केली, त्यावर पत्रकार यांनी उद्या सकाळी दादाच्या ऑफिसला या, पैसे देतो असे सांगून त्याचा भांडाफोड केला. दरम्यान, फेसबुक हॅक करून आशा प्रकारे लूट सुरू असल्याने कुणीही आशा भुलथापणा बळी पडू नये असे आवाहन केले जात आहे