शिवसेना खासदारांवर गुन्हा दाखल; नियमांचे उल्लंघन करणे पडले महागात

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :- शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे यांनी अहमदनगर जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात कलम १४४ लागू असताना नियमांचे उल्लंघन केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खासदार लोखंडे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांवर लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यामध्ये खासदार सदाशिव लोखंडे, नानासाहेब शेळके, अण्णासाहेब वाघे, श्रीकांत मापारी, सोमनाथ गोरे, सौरभ शेळके, विठ्ठल शेळके, शिवाजी शेळके, विलास गुळवे, बाबासाहेब पठारे, यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान याबाबतचे सविस्तर वृत्त असे कि, कोरोनाच्या पार्शवभूमीवर जिल्ह्यात कलम १४४ लागू करण्यात आला आहे.

असे असतानाही शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह पिंपरी निर्मळ शिवारात ४०० केव्ही महावितरण केंद्राजवळ बेकायदेशीर जमाव जमवून जिल्हाधिकारी जमावबंदी

आदेशाचे उल्लंघन व कोरोनाचे आजाराचे गांभीर्य लक्षात न घेता साथ रोग नियंत्रण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी राहता तालुक्यातील लोणी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोणी पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार सुदाम फटांगरे यांनी फिर्याद दाखल केली आहे. आरपी आयचे राहता तालुका अध्यक्ष करण कोळगे यांनी लोणी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24