अहमदनगर Live24 टीम, 9 जून 2021 :- आखिल विश्वाचे अराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे वंशज हे सकल मराठा समाजासाठी सर्वोच्च स्थानी आहेत, असे प्रतिपादन संजीवनी फाउंडेशनचे सचिव सुमित कोल्हे यांनी केले.
शिवराज्याभिषेक दिन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा झाला. सुमित कोल्हे यांनी रविवारी कोपरगावातील श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
मराठा आरक्षणावर छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी जाहीर केलेल्या भुमिकेबद्दल त्यांनी आपले विचार मांडले.
ते म्हणाले, मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी रविवारी (६ जुन) दुर्गदुर्गेश्वर रायगडावर केलेल्या घोषणेबाबत व त्यांच्या संपूर्ण नियोजनात सकल मराठा समाज त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत राहील व प्रत्येक आंदोलनाला आपला पाठिंबा राहील,
असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे, माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल, कोपरगाव एस.टी. कामगार सेना अध्यक्ष भरत मोरे, मनसेचे अनिल गायकवाड,
नगरसेवक जनार्दन कदम, माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे, माजी नगरसेवक बाळासाहेब आढाव, वैभव आढाव, राहुल राजुरकर, सुनिल साळुंके व इतर मान्यवर उपस्थित होते.