अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :- शहरातील भिस्तबाग चौकात परिस फाऊंडेशन या सामाजिक संस्थेच्या कार्यालयात तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी लक्ष्मी दुलम, रमाकांत सोनी व दिनेश दुलम यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी संदीप वाघचौरे, दिपक वाघचौरे, प्रिका अकोलकर, अनिता चोपडे, फाऊंडेशनच्या अध्यक्षा निकिता वाघचौरे, सचिव वर्षा काळे आदी उपस्थित होते.
फाऊंडेशनच्या अध्यक्षा निकिता वाघचौरे म्हणाल्या की, छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच्या कल्याणासाठी आपले स्वराज्य उभे केले.
जात, धर्म, पंथ न मानता त्यांनी सर्वांना न्याय देऊन, समता व बंधुत्व प्रस्थापित केले. परस्त्रीला माते समान वागणुक देऊन त्यांनी नेहमीच महिलांचा सन्मान केला.
आज सर्व समाजाला त्यांचे कार्य व विचार दिशादर्शक आहे. त्यांच्या प्रेरणेने परिस फाऊंडेशन समाजात वंचितांना मदतीचा हात देत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.