अहमदनगर Live24 टीम, 12 सप्टेंबर 2021 :- येथील शिवचरित्र व्याख्याता ओंकार बाबासाहेब व्यवहारे याने गणेशोत्सवानिमित्त शाडू मातीपासून स्वत:च्या हाताने श्री गणेशाची मूर्ती साकारुन तिची प्रतिष्ठापना आपल्या घरी केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आपण सण उत्सव साजरे करू शकतो त्या छत्रपतींना मानवंदना मी प्रत्येक वर्षी देत असतो नव्हे ते आपले कर्तव्य आहे
आणि यावर्षी देखील खा.युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली पुठ्ठ्याच्या सहाय्याने ‘शिवतीर्थ’चा देखावा सादर करुन छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली आहे.
या माध्यमातून पर्यावरण जपण्याचा छोटासा प्रयत्न करून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेश दिला आहे. चि.ओंकार हा बालपणापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर व्याख्यान देत असून,
अनेक मान्यवरांनी त्याचे कौतुक करुन अनेक पुरस्कारही दिले आहेत. सध्या ओंकार अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती (रायगड) सदस्य म्हणून काम पाहत आहेत. त्याने बनविलेल्या पर्यावरणापुक श्री गणेश व देखावा पाहण्यासाठी परिसरातील नागरिक येत आहेत.