अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2021 :-शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं पुण्यात निधन झालंय. ते 100 वर्षांचे होते. पुण्यातल्या दीनानाथ रुग्णालयानं बाबासाहेबांच्या निधनाची माहिती अधिकृत केली आहे.
आज सकाळी पहाटे 5 वाजून 7 मिनिटांनी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. बाबासाहेबांचं निधन वृद्धापकाळानं झाल्याचं रुग्णालयानं म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी पुरंदरे घसरून पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. बाबासाहेब हे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून दाखल होते.
(शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि त्यांची प्रकृती चिंताजनक होती)पुरंदरे यांच्याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ते कोथरूड यांच्या घरी घसरून पडले. त्याच्या डोक्याला जखम झाली होती.
बाबासाहेब पुरंदरे यांना न्यूमोनिया होऊन वृद्धपकाळाने ते गेल्या आठवड्याभरापासून दीनानाथ रुग्णालयामध्ये दाखल होते. शिवशाहीर म्हणून प्रसिद्ध बाबासाहेब पुरंदरे यांनी 29 जुलै 2021 रोजी वयाच्या शंभरीत पदार्पण केलं होतं. या निमित्त पुण्यातील कात्रज येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं.
या कार्यक्रमाला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले उपस्थित होत्या. महाराष्ट्रसह देशभरात इतिहास संशोधक, ‘शिवशाहीर’ आणि लेखक म्हणून ते ओळखले जायचे. त्याचं जन्म नाव बळवंत मोरेश्वर पुरंदरे असं आहे. त्यांचा जन्म 29 जुलै 1922 रोजी पुण्याजवळच्या सासवड इथे झाला.