पालकमंत्री मुश्रीफ यांच्या उपस्थितीत ‘शिवस्वराज्य दिन’ साजरा होणार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 6 जून 2021 :- छत्रपती शिवाजी महाराज यांनी 6 जून 1674 रोजी हे रयतेचे राज्य शाश्वत, चिरंतर रहावे, म्हणून राज्यभिषेक घेतला. तोच आजचा दिवस ‘शिवराज्यभिषेक’ दिन आहे.

यामुळे नगरसह राज्यातील सर्व ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद कार्यालयामध्ये सकाळी 9 वाजता सर्व पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांनी शिवस्वराज्य गुढी उभारुन त्यास अभिवादन करावे, असे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत.

अहमदनगर जिल्हयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद इमारतीचे आवारामध्ये आज रविवारी सकाळी 9 वाजता हा दिन मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. शिवशक राजदंड स्वराज्यगुढी यावेळी उभारण्यात येणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वत:चा राज्यभिषेक करुन घेतलेला हा दिवस स्वराज्याची, सार्वभौमत्वाची, स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा दिवस आहे.

त्यामुळेच या दिवसाचे महत्व आणखी दृढ होण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 6 जून हा दिवस शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आज नगर जिल्हा परिषदेत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे.

अहमदनगर लाईव्ह 24