अहमदनगर Live24 टीम, 27 जुलै 2021 :- इंधनाचे वाढते दर देशातील नागरिकांच्या राहणीमानाचं गणित बिघडवून गेलं आहे. अशाच परिस्थितीमध्ये देशाचे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पूरी यांनी पेट्रोल आणि डिझेलवर जास्तीत जास्त कर आकारणाऱ्या राज्यांची नावं सांगितली आहेत.
केंद्रीय मंत्र्यांच्या माहितीनुसार देशात पेट्रोलवर सर्वाधिक कर मध्यप्रदेश या राज्यात लावण्यात येतो. तर, राजस्थांनमध्ये डिझेलच्या किंमतींवर सर्वाधिक कर आकारला जातो. चालू महिन्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी विक्रमी उंची गाठली आहे.
याच गमिताची फोड करुन पाहिल्यास समोर आलेल्या माहितीनुसार पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे 55 आणि 50 टक्के राज्यांचे कर जोडलेले असतात. त्तरात दिलेल्या माहितीनुसार, केंद्राकडून 2020-21 या आर्थिक वर्षासाठी पेट्रोलच्या दरांवर 1,01,598 कोटी रुपये आणि डिझेलच्या दरांवर 2,33,296 इतकी कराची रक्कम आकारली आहे.
देशात सर्वाधिक कमी वॅट अंदमान- निकोबार द्वीपसमुहात आकारला जातो. याचं प्रमाण अनुक्रमे 4.82 रुपये प्रति लीटर आणि 4.74 रुपये प्रति लीटर इतकं आहे. तसेच मध्य प्रदेशात पेट्रोलवर 31.55 रुपये प्रति लीटर इतका वॅट आकारला जातो. तर, राजस्थानमध्ये डिझेलवर 21.82 रुपये प्रति लीटर इतका वॅट आकारला जातो.