सामान्यांना झटका ; गॅसच्या किमती 50 रुपयांनी वाढल्या, वाचा सविस्तर…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 15 फेब्रुवारी 2021:- घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती  50 रुपयांनी वाढल्या आहेत. आज  दुपारी 12 वाजेनंतर  नवीन दर लागू होतील. किंमत वाढल्यानंतर 14.2 किलो सिलिंडरची किंमत 769 रुपये होईल.

गॅस सिलिंडरच्या किंमती सातत्याने वाढत आहेत. 4 फेब्रुवारीला सिलिंडरच्या किंमतीत 25 रुपयांनी वाढ करण्यात आली. आता पुन्हा 50 रुपये वाढविण्यात आले आहेत. गेल्या 14 दिवसांत गॅस सिलिंडर्समध्ये 75 रुपयांनी वाढ झाली आहे.

एकीकडे सिलिंडर्स दिवसेंदिवस महाग होत आहेत, तर दुसरीकडे केंद्र सरकारने आर्थिक वर्ष 2022 साठी पेट्रोलियम अनुदान कमी करून 12,995 कोटी रुपये केले आहे. यानंतर सरकार एलपीजी सिलिंडरवरील अनुदान लवकरच संपवू शकेल असा अंदाज वर्तविला जात आहे. दुसरीकडे, पेट्रोलियम किरकोळ कंपन्यांनी रविवारी सलग सहाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली.

ताज्या वाढीसह, दिल्लीत पेट्रोल 88.73 आणि डिझेल 79.06 वर पोहोचले आहे. जागतिक बाजारपेठेतील तेजी नंतर स्थानिक कंपन्यांनी रविवारी पेट्रोल 29 पैशांनी तर डिझेल 32 पैसे प्रतिलिटर महागले. यासह किरकोळ इंधनाचे दर नव्या विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत.

कोठून कोठपर्यंत  वाढ  झाली  : –
डिसेंबरमध्ये तेल कंपन्यांनी 14.2 किलो घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत प्रत्येकी 50-50 रुपयांची वाढ केली होती. यानंतर, जानेवारीत कोणतेही बदल करण्यात आले नाहीत. त्यानंतर फेब्रुवारीच्या पहिल्या दिवशी गॅस सिलिंडरची किंमत वाढली नाही. परंतु  3 दिवसानंतर 4 तारखेला तेल कंपन्यांनी गॅस सिलिंडरमध्ये 25 रुपयांची वाढ केली.

विशेष म्हणजे 1 फेब्रुवारीला तेल कंपन्यांनी  10 किलो व्यावसायिक एलपीजी सिलिंडर्सच्या किंमती 190 रुपयांनी वाढविल्या होत्या. त्यानंतर 4 फेब्रुवारी रोजी 19 किलो सिलिंडरच्या दरात 6 रुपयांची कपात करण्यात आली होती.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24