धक्कादायक ! या तालुक्यात 2 दिवसात 3 मुलीचे अपहरण

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 5 मे 2021 :-कोपरगाव तालुक्यातील बोलकी, शहजापूर व शिरसगाव या भागातून दोन दिवसांत तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याची घटना घडली आहे.

याप्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि,

तालुक्यातील बोलकी शिवारातील १६ वर्षीय मुलीचे मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास अपहरण झाले आहेत तर दुसऱ्या घटनेत शहजापूर येथील १४ वर्षीय मुलीचे बुधवारी अपहरण झाले आहे.

तर तिसऱ्या घटनेत शिरसगाव येथील १६ वर्षीय मुलीचे बुधवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास अपहरण झाले आहे. अशा एक प्रकारच्या घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडल्या आहेत.

दरम्यान या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस पथक करत आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24