धक्कादायक ! कोरोनाबाधित रुग्णाच्या नातेवाईकाला डॉक्टरसह कर्मचाऱ्याकडून मारहाण

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 12 मे 2021 :-जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. यातच कोरोनाला संधी समजून अनेक खासगी रुग्णालये रुग्णांच्या नातेवाईकांची आर्थिक पिळवणूक करत आहे.

मात्र आज नगर शहरात तर हद्दच झाली. चक्क रुग्णाच्या नातेवाईकाला डॉक्टरसह कर्मचाऱ्यांकडून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे.

शहरातील पॅसिफिक कोविड सेंटरमधील मृतदेहाचे शुटिंग केल्याने आणि अधिकृत बिल मागितल्याने कोविड सेंटरचे कर्मचारी आणि डॉक्टराणी मारहाण केल्याचा आरोप नातेवाईकांनी आरोप केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, अहमदनगर शहरातील पॅसिफिक केअर सेंटरमध्ये) 5 मे रोजी भागवत सुपेकर यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे दाखल करण्यात आले होते.

त्यावेळी त्यांचे नातेवाईक आकाश ढोके आणि संजीव जाधव भेटण्यासाठी गेले असता सुपेकर हे खूप घाबरलेले होते. त्यांच्या आजूबाजूला 3 ते 4 मृतदेह अनेक तासांपासून पडून होते.

ते हलवण्याची विनंती कोविड सेंटरच्या कर्मचाऱ्यांना केली. मात्र त्यांनी कुठलीही दखल घेतली नाही म्हणून आकाश ढोके यांनी तेथील प्रकार मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला.

तसेच रुग्णाचा डिस्चार्जवेळी हॉस्पिटलने जास्त बिल भरण्यास सांगितले. यावरून वाद निर्माण झाला आणि आकाश ढोकेला सेंटरच्या कर्मचाऱ्यांनी आणि डॉक्टरांनी मारहाण केली.

गेट मधून मारहाण करत हॉस्पिटलच्या कोविड सेंटरमधील रूममध्ये डांबून ठेवल्याचा आरोप आकाश ढोके यांनी केला.

त्या नंतर रात्री उशिरा डॉ प्रशांत जाधव यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात आकाश ढोकेसह चार जणांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24