अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- पाटोदा तालुक्यातील सौताडा येथील रामेश्वर दरीत उडी मारुन एका महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
दरम्यान रोहिणी सोमेश्वर कुलकर्णी (वय 57, रा.केडगाव, जि.नगर) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, सोमवारी (दि. २०) सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास सौताडा धबधब्याच्या पाण्यात एका महिलेचे प्रेत पर्यटकांना दिसून आले.
सौताडा गावातील युवकांच्या मदतीने हे प्रेत पाण्यातून बाहेर काढले. धबधब्याजवळ एक पर्स, मोबाईल अशा वस्तू सापडल्या.
त्यावरुन या महिलेची ओळख पटविण्यात आली सादर मृत महिलेचे नाव रोहिणी सोमेश्वर कुलकर्णी (वय ५३, रा. केडगाव, ताराबाग कॉलनी) असे आहे.
संबंधित महिलेच्या मोबाईलवरुन तिच्या नातेवाईकांना याबाबत कळविण्यात आले.दोन महिन्यापूर्वी या महिलेच्या विवाहित मुलीचे अपघाती निधन झाले होते.
मुलीच्या मृत्यूच्या वियोगात रोहिणी होत्या. याच वैफल्यातून त्यांनी आत्महत्या केली असावी, असा जबाब महिलेचा मुलगा व नातेवाईकांनी पाटोदा पोलिसांना दिला आहे.