अहमदनगर Live24 टीम, 20 एप्रिल 2021 :- रुग्ण असलेली रुग्णवाहिका चालकाने पळवून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकास घारगाव पोलिसांनी संगमनेर येथून जेरबंद केले.
ही घटना सोमवारी रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे घडली. एका रुग्णाला त्याचे नातेवाईक रुग्णवाहिकेतून सोमवारी रात्री संगमनेर तालुक्यातील घारगाव येथून पुण्याला जात होते.
या रुग्णवाहिकेचा चालक हा रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास घारगाव शिवारातील हाॅटेल लक्ष्मी येथे जेवणाचे पार्सल घेण्यासाठी थांबला.
यावेळी रुग्णाचे नातेवाईक रुग्णवाहिकेच्या खाली उतरले होते. याचाच फायदा घेत रुग्णवाहिका चालकाने रुग्णासह रुग्णवाहिका घेऊन संगमनेरच्या दिशेने पोबारा केला.
रुग्णासह रुग्णवाहिका पळवल्याची माहिती घारगाव पोलिसांना रुग्णाच्या नातेवाईकांनी दिली.
पोलिस निरीक्षक सुनिल पाटील, राजेंद्र लांघे, प्रमोद चव्हाण, हरिश्चंद्र बांडे यांनी तातडीने तपासाला गती देत संगमनेर येथून ही रुग्णवाहिका व चालकाला ताब्यात घेतले.