अहमदनगर Live24 टीम, 3 मे 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून यामुळे जिल्ह्यात अनेकांचे प्राण देखील गेले आहे. सर्वसामान्यांसह नेतेमंडळी देखील या विषाणूच्या प्रादुर्भावाची जाळ्यातून सुटू शकलेले नाही.
यातच श्रीगोंदा येथील भाजप नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्य झाला आहे. संतोष खेतमाळीस असे त्यांचे नाव आहे. संतोष खेतमाळीस यांना 12 एप्रिल रोजी कोरोना विषाणूची बाधा झाली होता.
19 तारखेला सिटीस्कॅन केल्यानंतर त्यांचा स्कोर 23 आल्याने त्यांना तातडीने नगर येथील विखे पाटील हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. संतोष खेतमाळीस यांचे संपूर्ण कुटुंब कोरोना विषाणूच्या विळख्यात सापडले होते.
त्यांच्या पत्नी माजी नगराध्यक्ष सुनीता खेतमाळीस यांना व त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांना उपचार करून घरी सोडण्यात आले होते. संतोष खेतमाळीस यांनाही रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार होते.
मात्र अचानक पुन्हा त्रास होवू लागल्याने त्यांना पुन्हा व्हेंटिलेटर लावण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मावळली.