धक्कादायक ! भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याने घरातच घेतला गळफास

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 20 सप्टेंबर 2021 :- भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आणि माजी परिवहन मंत्री रजिंदरपाल सिंह भाटिया यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. भाटिया यांनी इतक्या टोकाचे पाऊल का उचलले, याच अद्याप कारण स्पष्ट झालं नाही.

दरम्यान यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. रविवारी संध्याकाळी रजिंदरपाल घरी एकटेच होते. कुटु्ंबातील सदस्य जेव्हा घरी आले तेव्हा त्यांनी भाटिया यांनी गळफास घेतला असल्याचं निदर्शनास आलं. त्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.

रजिंदरपाल भाटिया गेल्या काही दिवसांपासून आजाराने त्रस्त होते. राजनादगांव जिल्ह्यातून खुज्जी विधानसभा मतदारसंघातून रजिंदरपाल सिंह भाटिया तीन वेळ आमदार म्हणून निवडून आले होते. रमन सरकारच्या पहिल्या टर्ममध्ये रजिंदरपाल सिंह भाटिया यांना मंत्रिपद देण्यात आलं होतं.

त्यानंतर मंत्रिपदावरूनही हटवण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना सीएसआईडीसीचे चेअरमनपद दिले होते. 2003 मध्ये रजिंदरपाल सिंह भाटिया यांना भाजपने उमेदवारी दिली होती.

त्याचवेळी त्यांना मंत्रिपद सुद्धा मिळाले होते. 2008 च्या निवडणुकीत मात्र पक्षाने त्यांना उमेदवारी दिली नव्हती. 2013 मध्ये सुद्धा भाटिया यांना भाजपने तिकीट दिले नव्हते.

त्यामुळे त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला पण त्यांनी दुसऱ्या स्थान पटकावले होते.

Ahmednagarlive24 Office