अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2021 :-महिला अत्याचाराच्या घटनां काही केल्या कमी होताना दिसत नाही आहे .
दिवसेंदिवस महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनांमुळे जिल्ह्यातील महिलांचे अस्तित्व धोक्यात येऊ लागले आहे. नुकतेच श्रीरामपूर तालुक्यात एका महिलेवर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील 25 वर्षीय महिलेस मारहाण करीत बळजबरीने अत्याचार केल्याच्या आरोपावरून किशोर वराडे राहणार बेलापूर याच्याविरोधात श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत पीडित महिलेने पोलीस ठाण्यात मंगळवारी सायंकाळी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. किशोर वराडे याने बळजबरीने आपल्या घरात घुसून लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत एका रूममध्ये नेऊन शारीरिक अत्याचार केला.
पीडितेच्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोसई के. बी. घायवट हे करत आहे.
ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |