धक्कादायक..कोरोना तपासणी केली नाही तरीही रिपोर्ट पॉझिटिव्ह

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 19 एप्रिल 2021 :-राहुरी कृषी विद्यापीठात सुरू असलेल्या कोव्हीड तपासणी केंद्राचा भोंगळ कारभार आज सोमवार दि १९ एप्रिल रोजी चव्हाट्यावर आला असून राहूरी शहरातील सचिन साळवे यांची तपासणी न करताच त्यांचा कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह दिला असल्याने खळबळ उडाली आहे.

राहुरी येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन दौलत साळवे हे दिनांक १४ एप्रिल रोजी त्यांच्या नातेवाईकांना जेवणाचा डबा देण्यासाठी राहुरी कृषी विद्यापीठातील कोव्हीड तपासणी केंद्रात गेले होते.

यावेळी त्यांनी तपासणीसाठी नाव नोंदणी केली. संबंधित कर्मचाऱ्यांनी त्यांना काही वेळाने बोलाविले. मात्र सचिन साळवे हे पुन्हा तेथे गेले नाहीत.

त्यांनी कोणत्याही प्रकारची तपासणी केली नाही.किंवा कोणत्याही स्त्रावाचा नमूना दिला नाही. तसेच त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास नव्हता.

मात्र अहमदनगर येथील आर टी पी सी आर लॅब येथून आलेल्या तपासणी अहवालात सचिन दौलत साळवे यांना कोरोना पॉझिटिव्ह दाखविण्यात आले.

तर राहुरी ग्रामीण रूग्णालयाने दिलेल्या अहवालात त्यांना गैरहजर दाखविण्यात आले आहेत. मात्र अहवाल पाॅझिटिव्ह आल्या नंतर सचिन साळवे यांच्या हातावर कोरोना पॉझिटिव्हचा शिक्का मारून त्यांच्या घरावर स्टिकर लावण्यात आले.

यामुळे सचिन दौलत साळवे व त्यांचे कुटुंबीय भयभीत झाले असून त्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24