धक्कादायक ! कोरोनाने हिरावून घेतले कुटुंबातील करते पुरुष

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 9 एप्रिल 2021 :-देशासह राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. दरम्यान देशात सर्वाधिक रुग्णसंख्या महाराष्ट्रात वाढत आहे. यामुळे चिंता वाढली आहे.

यातच नाशिक जिल्ह्यातून एक अत्यंत दुर्दैवी बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील देवळा मधील एका कुटुंबातील दोन कर्त्या व्यक्तींच्या निधनाचे दुःख पचवत असतानाच आणखी एका कर्त्या पुरुषाचेही तेथेच निधन झाल्याने येथे हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, देवळा मधील गुंजाळनगर येथील प्रगतिशील शेतकरी प्रभाकर दगा गुंजाळ यांना कोरोना झाल्यामुळे त्यांच्यावर नाशिक येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले.

त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाच त्यांचे वडील दगा श्‍यामभाऊ गुंजाळ यांनाही संसर्ग झाल्यामुळे त्यांच्यावर उमराणे येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचे त्यातच निधन झाले.

हे दोन दुःख पचविणे कुटुंबासाठी मोठे मुश्किलीचे होते. कारण कुटुंबातील प्रमुखच या कोरोनाच्या विळख्यात सापडले आणि हळूहळू कोरोनाने त्यांना गिळंकृत केले. यामुळे कुटुंबियांवर मोठे संकट कोसळले होते.

यातच कुटुंबातील दोन कर्त्या व्यक्तींच्या निधनाचे दुःख पचवत असतानाच नाशिक येथे वास्तव्यास असलेले भाऊसाहेब दगा गुंजाळ यांनाही संसर्गाने घेरल्याने त्यांच्यावर नाशिक येथे उपचार सुरू होते. त्यांचेही तेथेच निधन झाल्याने येथे हळहळ व्यक्त होत आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24