धक्कादायक : सांडपाण्यात आढळला कोरोनाचा विषाणू !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :- देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. अशातच चिंता आणखी वाढवणारा प्रकार समोर आला आहे.

लखनऊमध्ये सांडपाण्याचं परिक्षण केलं असता त्यात कोरोना विषाणूंचं अस्तित्व असल्याचं समोर आल्याने खळबळ उडाली आहे. मुंबईत सांडपण्यात कोरोना विषाणू आढळल्यानंतर देशातील अनेक ठिकाणच्या सांड पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते.

यावेळी लखनऊमधून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. पीजीआय मायक्रोबायोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. उज्ज्वला घोषाल यांनी याबाबत महिती दिली. आयसीएमआर-डब्ल्यूएचओद्वारे देशात सांडपाण्याच्या नमुन्यांचं परिक्षण करण्यास सुरुवात करण्यात आली.

मुंबई, उत्तर प्रदेश, हैद्राबादसह अनेक प्रमुख शहरांतील सांडपाण्याचेही नमून घेण्यात आले. यात लखनऊ येथील परिक्षणामध्ये सांडपाण्यात कोरोना विषाणूंचं अस्तित्व आढळून आल असल्याची माहिती घोषाल यांनी दिली.

लखनऊमधील रुकपूर, घंटाघर आणि तिसरी मोहाल अशा एकूण तीन ठिकाणी सांडपाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. यातील रुकपूर येथील सांडपाण्यात कोरोना विषाणूचा अंश सापडला आहे.

दरम्यान, ही माहिती अतिशय प्राथमिक स्वरुपातील असून यावर आणखी अभ्यास होणं शिल्लक असल्याचंही डॉ. घोषाल यांनी सांगितलं आहे.

अहमदनगर लाईव्ह 24