धक्कादायक ! डॉक्टर लपवतायत कोरोनाबाधित रुग्णांची माहिती… प्रशासनाने दिले हे आदेश

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 31 जुलै 2021 :- जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना आता पुन्हा एकदा जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. यामुळे प्रशासन पुन्हा एकदा सतर्क झाले आहे . मात्र यातच शेवगाव तालुक्यातून एक अजबच प्रकार समोर आला आहे. शेवगावमधील काही डॉक्टर कोरोनाबाधित रुग्णांची माहिती लपवत असल्याच्या तक्रारी आहेत.

त्यांना तालुका प्रशासनाने सूचना द्याव्यात. तरीही ऐकत नसतील तर त्यांच्यावर कडक कारवाई करा, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी शेवगाव तालुका प्रशासनाला दिले. जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव येथे आले होते.

यावेळी त्यांनी परिस्थितीचा आढावा घेऊन प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. तसेच ते बोलताना म्हणाले कि, नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने गाव बंद ठेवले तसे स्वयंशिस्तीने कोरोना निर्बंधाचे पालन करावे. त्यातूनच आपले गाव कोरोनामुक्त करा. दशक्रिया विधी, उद्घाटनाचे कार्यक्रम अशा ठिकाणी कोरोना नियमांचे पालन करा, असे आवाहन भोसले यांनी केले.

यावेळी तहसीलदार अर्चना पागिरे, गटविकास अधिकारी महेश डोके, तालुका आरोग्य अधिकारी संकल्प लोणकर, जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ साळवे, श्रीकांत गोरे, सहायक गटविकास अधिकारी बाळासाहेब कासार, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी मल्हरी इसरवाडे,

आरोग्य विस्तार अधिकारी सुरेश पाटेकर, वैद्यकीय अधिकारी सुप्रिया लुणे, सहायक पोलिस निरीक्षक सुजित ठाकरे, पोलीस नाईक बाबासाहेब शेळके, कामगार तलाठी गणेश लोखंडे, ग्रामविकास अधिकारी दिलदार बागवान, आरोग्य सेविका व कर्मचारी उपस्थित होते.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24