अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2022 :- एका मद्यधुंद तरुणाने बोकडाऐवजी बोकडाला पकडलेल्या व्यक्तीचा गळा कापला असल्याची धक्कादायक घटना आंध्र प्रदेशातील चित्तूरमध्ये घडली आहे.
दरम्यान जखमीला रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या खून प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.
हे प्रकरण चित्तूरमधील वलासापल्ले येथील आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, संक्रांतीनिमित्त आरोपी चालपाठी जनावरांचा बळी देत होता. यावेळी 35 वर्षीय सुरेशने बोकड पकडले होते.
त्यानंतर अचानक चालपाठीने बोकडाऐवजी सुरेशचा गळा कापला. चालपाठी हा दारूच्या नशेत होता. बोकडाऐवजी त्याने सुरेशच्या गळ्यावर शस्त्राने वार केला.
जखमी अवस्थेत त्याला जवळच्या मदनपल्ले सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. येथे डॉक्टरांनी सुरेशला मृत घोषित केले. घटनास्थळावरून चालपथीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मृत सुरेश विवाहित असून त्याला दोन मुले आहेत. दरम्यान जुन्या प्रथेनुसार देवीच्या प्राचीन मंदिरात दरवर्षी मकर संक्रांतीनिमित्त यज्ञाचे आयोजन केले जाते.
या दिवशी मंदिरात मिष्टान्नाचा नैवेद्य दाखविण्यासाठी बाेकडाचा बळी दिला जाताे. सुरेश आपल्या बाेकडा बळी देण्यासाठी मंदिर परिसरात आला हाेता त्यावेळी हा भयंकर प्रकार घडला.