अहमदनगर Live24 टीम, 30 मे 2021 :- संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पठार येथे विज पडून एका महिलेसह चार शेळ्या मृत्यूमुखी पडल्याची दुर्दैवी घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली.
या दुर्घटनेत अनिता उर्फ मुक्ताबाई संजय वनवे (वय 39, रा. हिवरगाव पठार, ता. संगमनेर) यांचा मृत्यू झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, शनिवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास सोसाट्याचा वारा सुरु झाला. वादळी वार्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली.
त्याच दरम्यान विजेचा कडकडाड होत होता. अनिता वनवे ही महिला घरापासून जवळच असलेल्या शेतात शेळ्या चारण्यासाठी गेली होती.
दरम्यान पाऊस सुरु झाल्याने ति शेळ्यांना घेवून लिंबाच्या झाडाखाली उभी राहिली होती. त्याच दरम्यान लिंबाच्या झाडावर विज कोसळली.
झाडा खाली उभी असलेली महिला व चार शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आहे.