धक्कादायक : भेसळ करणाऱ्या दूध संकलन केंद्राचा फर्दाफाश, १ हजार लिटर दुध केले नष्ट

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2021 :- राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथील दोन दूध संकलन केंद्रावर अन्न औषध प्रशासनाने छापा मारून १ हजार ३०३ लिटर भेसळयुक्त दूध असा एकूण ५०,२६४ रुपये किंमतीचे भेसळयुक्त दूध नष्ट करून दोन दूध संकलन केंद्रावर कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर माहीती अशी की मंगळवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी ब्राह्मणी येथील जालिंदर ठकाजी वने यांच्या गोठ्यात छापा टाकला असता या ठिकाणी दूध भेसळीसाठी साठवलेली व्हे पावडर ५८ किलो लाईट लिक्विड प्याराफीन (पावर ऑइल १७० किलो) भेसळयुक्त गाईचे दूध ५३ लिटर असा एकूण १८,५२४ रु किंमतीचा साठा जप्त केला

सदर भेसळयुक्त दुधाचे व्हे पावडर ,लाईट लिक्विड प्याराफीनचे नमुने विश्लेषण तपासणी साठी घेण्यात आले आहे तर भेसळयुक्त दूध जागेवर नष्ट करण्यात आले.दुधात भेसळ करण्यासाठी वापरण्यात येणारे पदार्थ जप्त करण्यात आले आहे.जालिंदर वने हा दररोज १७० लिटर दुध डेअरीस पुरवठा करत होता

प्रत्यक्षात मात्र त्याच्या गोठयातुन १०० लिटर पेक्षा कमी दूध मिळत असल्याचे निदर्शनास आले.वने हा ७० लिटर पेक्षा भेसळयुक्त दूध तयार करून दोन दूध संकलन केंद्रात पुरवठा करत होता त्यामध्ये मुक्ताई दूध संकलन केंद्र ब्राह्मणी , श्रीनिवास दूध संकलन केंद्र शनी शिंगणापूर रोड ब्राह्मण यांचा समावेश आहे

मुक्ताई डेअरीचे चालक दिगंबर गंगाधर पठारे यांच्या दूध संकलन केंद्रावर दुधाचे नमुने तपासण्यासाठी घेऊन ८०० लिटर दुध अंदाजे किंमत २० हजार रुपये तर श्रीनिवास दूध संकलन केंद्राचे प्रकाश शिवाजी नगरे याच्या दूध संकलन केंद्रावर छापा मारून दूध भेसळीचे नमुने तपासणीसाठी घेतले ११,७०० रुपये किंमतीचे ४५० लिटर दुध भेसळीच्या कारणावरून जागेवर नष्ट केले.

या कारवाईत अन्न औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख उपस्थितीत अन्न सुरक्षा अधिकारी प्रदीप कुटे, शरद पवार, उमेश सूर्यवंशी, प्रदीप पवार यांनी कारवाई केली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24