अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- भेसळयुक्त दुधाचा व्यापार करणाऱ्या संकलन केंद्रावर छापा टाकत दुधाचे साहित्य जप्त करण्यात आले. अकोले तालुक्यातील जांभळे येथे ही छापेमारी झाली.
यामुळे दूध भेसळ प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.दुध संकलन करणाऱ्या योगेश चव्हाण यास दुधात तेल व पावडर भेसळ करुन दुध संकलन करत असतांना रंगेहात पकडले आहे.
अहमदनगर येथील अन्न व औषध सुरक्षा विभागाने छापा टाकून १५ गोणी पावडर व तेल ड्रम आदी साठा हस्तगत केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, योगेश हा दुधात भेसळ करत असल्याचे माहिती पथकाला मिळाली होती.
त्यानुसार चव्हाण याचे घरी आज बुधवारी (दि.२२) सकाळी ६ वाजेच्या सुमारास छापा मारला असता तेथे दुधात भेसळ करण्यासाठीचे १५ गोणी पावडर, तेल ड्रमसह साहित्य आढळले.
त्यातील ४० लिटर दुधातून सँपल घेतले तर तो चालवत असलेले जांभळे येथील संकलन केंद्रावरही छापा मारला. तेथील सुमारे १ हजार लिटर भेसळयुक्त दूध नष्ट केले.
अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी पंचनामा करुन मुद्देमाल ताब्यात घेऊन सॅम्पल तपासणीसाठी घेतले. या सँपलचा अहवाल आल्यानंतर पोलिसांत गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.