धक्कादायक ! किरकोळ वादातून महिलेला दिले पेटवून

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:- सरपण तोडण्याच्या वादातून २४ वर्षीय महिलेला तिच्या जावेने व चुलत सासूने पेटवून दिल्याची घटना संगमनेर तालुक्यातील मनोली या गावात घडली आहे.

या घटनेत सदर महिला ६० टक्के भाजली आहे. अर्चना सदाशिव शिंदे (वय २४, रा. मनोली खंडोबा मंदिराजवळ) असे पेटवून दिलेल्या महिलेचे नाव आहे.

तर याप्रकरणी पेटवून देणाऱ्या दोन महिलासह तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, आरोपी आकांक्षा शिंदे ही अर्चनाची जाव,

आरोपी हरणबाई शिंदे अर्चनाची चुलत सासू, शंकर शिंदे दीर आहे. अर्चना घराजवळच असणाऱ्या खंडोबा मंदिराजवळ सरपण आणण्यासाठी गेल्या होत्या.

त्यावेळी जाऊ आकांक्षा हिने ते आमचे सरपण असून घेऊ नको, असे धमकावले. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. आकांक्षाने पती शंकर यास फोन लावून दिला.

त्यावेळी अर्चनाला शिव्या देण्यात आल्या. त्यानंतर आकांशा या कुऱ्हाडीच्या दांड्याने अर्चनाला मारहाण केली. या दोघींमधील तुंबळ हाणामारी पाहून चुलत सासू हरणबाई तेथे आली.

हिची कायमची कटकट मिटवून टाक असे म्हणत अर्चनाचे हात धरले. आकांक्षाने घरातून डिझेलचा डबा व काडीपेटी आणली. रागातून अंगावर डीझेल ओतून पेटवून देण्यात आले.

कपड्यांनी पेट घेतल्याने अर्चनाने आरडाओरडा केला त्यावेळी तिची मुले व अन्य ग्रामस्थ मदतीला धावून येत पाणी आणून आग विझविली.

अर्चनाचे पती यांना बोलाविण्यात आले आणि अर्चना यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी आकांक्षा शिंदे, हरणबाई शिंदे आणि शंकर शिंदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24