अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :- जिल्ह्यात गेल्या वर्षभरापासून कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. यातच जिल्ह्यात सुरु असलेली कोरोनाची दुसरी लाट हि अतिशय गंभीर स्वरूपाची असलेली दिसून आली आहे.

यातच एका धक्कादायक माहिती समोर येत आहे. तिसरी लाट येण्यापूर्वीच लहान मुलांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो असल्याचे आकडेवारीतून स्पष्ठ होते आहे.

जिल्ह्यात मे महिन्यात शून्य ते अठरा वयोगटातील दहा हजार मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. जिल्हा प्रशासनाने या आकडेवारीस दुजोरा दिला आहे.

मुलांची प्रतिकारशक्ती चांगली असल्याने ते प्राथमिक उपचार घेऊन बरे होत आहेत, असे जिल्हा प्रशासनाने सांगितले. एप्रिल आणि मे या दोन महिन्यांमध्ये कोरोनाची दुसरी लाट जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर होती.

अहमदनगर जिल्ह्यामध्ये एप्रिल व मे महिन्यामध्ये मिळून 1 लाख 7 हजार रुग्णांची नोंद झाली. दरम्यान मे महिन्यात ८७ हजार रुग्ण सापडले असून यापैकी 10 हजार मुले बाधित आढळली.

मे महिन्यात बाधित आढळलेल्या मुलांचे वर्गीकरण :-

  • ० ते १ वर्षे – ८९
  • १ ते १०- ३,०८१
  • ११ ते १८ – ६,८५५
  • एकूण – १०,०२५
अहमदनगर लाईव्ह 24