धक्कादायक! महिलेस एकाचवेळी कोरोनाच्या दोन वेरिएंट्सचे संक्रमण ;तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता, वाचा संपूर्ण प्रकरण

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 12  जुलै 2021 :- कोरोना विषाणूचे नावनवीन वेरिएंट्स जगभर पसरत आहेत. परंतु बेल्जियममध्ये एक वेगळीच घटना समोर आली आहे.

एका महिलेला दोन वेगवेगळ्या वेरिएंट्सने एकाच वेळी संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. आणि पाचव्या दिवशी त्या महिलेचा मृत्यू झाला. ही बाब उघडकीस आल्यानंतर संशोधकांची चिंता वाढली आहे.

संशोधकांचे म्हणणे आहे की अशा प्रकरणांमुळे कोरोनाबरोबरच्या लढाईत अडचण आणखी वाढू शकते. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, या 90 वर्षीय महिलेला एकाच वेळी अल्फा आणि बीटाच्या वेरिएंट्सने संसर्ग झाल्याचे आढळले.

महिलेला लस दिली गेली नव्हती आणि घरीच राहून उपचार घेत होती. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना मार्चमध्ये ओएलव्ही रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या महिलेची कोरोना टेस्ट रुग्णालयात झाली ज्यामध्ये तिचा अहवाल पॉजिटिव आला.

सुरुवातीला महिलेची ऑक्सिजनची पातळी चांगली होती पण नंतर तिची तब्येत वेगाने खालावली आणि पाचव्या दिवशी त्या महिलेचा मृत्यू झाला. या अहवालात व्हेरिएंटपासून बचाव करण्यासाठी लस घेणे किती महत्त्वाचे आहे हे समजते.

जेव्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय कर्मचार्‍यांनी महिला कोरोनाच्या कोणत्या कोणत्या प्रकाराने संक्रमित आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिच्यामध्ये कोरोनाचे अल्फा आणि बीटा दोन्ही प्रकार सापडले.

अल्फा प्रथम यूकेमध्ये आढळला तर बीटा प्रकार प्रथमच दक्षिण आफ्रिकेत आढळला. संशोधकांनी अशी बाब गांभीर्याने घेण्याचा सल्ला दिला आहे. ओएलवी हॉस्पिटलमधील मॉलीक्यूलर बायोलॉजिस्ट आणि या विषयावरील संशोधक कर्त्या ऐनी वेंकीरबर्गन म्हणाल्या,

“त्यावेळी हे दोन्ही प्रकार बेल्जियममध्ये पसरले होते, शक्यतो त्या महिलेला दोन वेगवेगळ्या लोकांकडून ही दोन वेरिएंट्स मिळाली.” मात्र, तिला संसर्ग कसा झाला हे अद्याप समजू शकलेले नाही.

यावर्षी जानेवारीमध्ये ब्राझीलच्या शास्त्रज्ञांनीही सांगितले होते की देशातील दोन लोकांना एकाच वेळी कोरोनाच्या दोन भिन्न प्रकारांची लागण झाली आहे. यावर कोणताही अभ्यास प्रकाशित झाला नसला तरी.

एका प्रसिद्धीपत्रकात वेंकीरबर्गन म्हणाले, ‘एकाच वेळी दोन वेरिएंट्स संक्रमित होण्याची यापूर्वी अशी कोणतीही प्रकाशित घटना घडलेली नाही. कदाचित अशा बाबींकडे दुर्लक्ष केले जात आहे.

प्रोफेसर लॉरेन्स म्हणाले, ‘एकापेक्षा जास्त वेरिएंट्स रूग्णांवर किती परिणाम करतात हे जाणून घेण्यासाठी अधिक अभ्यास करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर, लसी घेणाऱ्यांवर एकापेक्षा जास्त वेरिएंट्सचा काय परिणाम होतो हे देखील जाणून घेण्याची गरज आहे.

अहमदनगर लाईव्ह 24