ताज्या बातम्या

धक्कादायक! चक्क 27 वर्षीय जावयाने केला 45 वर्षीय सासूवर बलात्कार

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2021 :- सासू-जावयाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना राज्यातील ठाणे जिल्ह्यात समोर आली आहे. 27 वर्षीय जावयावर त्याने त्याच्या 45 वर्षीय सासूवर बलात्कार केल्याचा आरोप आहे.

आरोपीविरुद्ध हिललाइन पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित सासू हिललाइन पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते, तर आरोपी जावई देखील उल्हासनगर येथे राहतो.

आरोपी जावई लग्नाआधीपासून पत्नीच्या आईवर म्हणजेच सासूवर एकतर्फी प्रेम करत होता. लाजेखातर तो सासूशी लग्न करू शकला नाही.

त्यामुळे आरोपीने पीडितेच्या मुलीकडे लग्नाची मागणी केली. त्यानंतर त्यांनी 2018 साली लग्न केले. त्यानंतर आता सासूने जावयावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

पीडितेच्या तक्रारीवरून उल्हासनगर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

घटना उघडकीस आल्यापासून आरोपी फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र त्याला लवकरच अटक करण्यात येईल अशीमाहिती पोलिसांनी दिली आहे.

Ahmednagarlive24 Office