अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2021:- एका अल्पवयीन मुलीचे तिच्या राहत्या घरातून एकाने अपहरण केल्याची घटना १२ मार्च रोजी राहुरी तालुक्यातील कोळेवाडी येथे घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून या फिर्यादीवरून पोलिसांनी दत्तात्रय गवारे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, राहुरी तालुक्यातील कोळेवाडी येथे सोळा वर्ष वयाची अल्पवयीन मुलगी ही तिच्या कुटुंबांसमवेत राहते.
१२ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास ती तिच्या घरात असताना आरोपी दत्तात्रय दादाभाऊ गवारे याने तिला अज्ञात कारणासाठी पळवून नेल्याचा संशय आहे.
असे त्या मुलीच्या वडिलांनी राहुरी पोलिसांत फिर्यादीत म्हंटले आहे. त्यानुसार त्याच्या विरोधात राहुरी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निलेशकुमार वाघ हे करीत आहे.