अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2021:- मेंढ्यांच्या काळापाशेजारी झोपलेल्या मेंढपाळ याच्यावर बिबट्याने हल्ला चढविल्याची घटना अकोले तालुक्यातील पापळवाडी परिसरात घडली आहे.
दरम्यान बिबट्याच्या या जीवघेण्या हल्ल्यात अंकुश रामदास पोकळे हा मेंढपाळ जखमी झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पापळवाडी परिसरात एका शेतात मेंढ्यांचे कळप बसलेले आहे. रात्री साडे बारा वाजेच्या सुमारास बिबट्या कळापाजवळ आला.
वाघुरीच्या बाहेर झोपलेल्या असलेल्या अंकुश रामदास पोकळे या मेंढपाळवरच बिबट्याने हल्ला केला. त्यावेळी त्याने मोठा आरडाओरडा केला.
आरडाओरडा होताच बिबट्याने उसात धूम ठोकली. यामध्ये मेंढपाळच्या डोक्याला नखे लागल्याने किरकोळ जखमी झाला आहे. शनिवारी याने अकोले ग्रामीण रुग्णालयात उपचार घेतले आहे.
दरम्यान परिसरातील नागरिकांनी पिंजरा लावण्याची मागणी केल्याने वनविभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी बी.एम. पोले यांच्या मार्गदर्शनाखाली पिंजरा लावण्यात आला आहे.