धक्कादायक ! विषारी औषध घेत विवाहितेची आत्महत्या

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 11 मार्च 2021:-मानसिक तणाव, कौटुंबिक समस्यां यामुळे हल्ली महिलांचे आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. दिवसेंदिवस होणाऱ्या अशा घटनांमुळे महिलांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

नुकतेच एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची घटना जिल्ह्यात घडली आहे. अकोले तालुक्यातील वीरगाव येथील एका विवाहितेने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

योगिता विजय कदम (वय २६) असे या विवाहित आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत महिलेचा पती विजय सुधाकर कदम यांनी अकोले पोलीस स्टेशनला खबर दिली असून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, योगिता विजय कदम हिने १० मार्च रोजी सकाळी साडे नऊ वाजण्यापूर्वी काहीतरी विषारी औषध सेवन केल्याने तिचा मृत्यू झाला.

यावेळी तातडीने अकोले ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी तिला मयत घोषित केले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24