House Construction : स्वत:च सुंदर घर असाव हे प्रत्येकाच स्वप्न असत. पण घराचं हे स्वप्न आता महाग होऊ लागलं आहे. लग्न पाहावं करून, घर पाहावं बांधून अशी एक म्हण आहे. ही म्हण आता मात्र तंतोतंत लागू होतेय. त्याच कारण असं हे की, बांधकामासाठी लागणारे साहित्य भरमसाठ महाग झाले आहे. सिमेंटपाठोपाठ आता घरबांधणीसाठी लागणाऱ्या सळईच्या दरात मोठी वाढ झाली आहे. देशात स्टीलचे दर वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
स्टील कंपन्या लवकरच दर वाढवणार
मान्सून हळूहळू संपुष्टात येत आहे. यामुळे देशभरातील बांधकामांना गती मिळणार आहे. ज्यांचं घराचं स्वप्न आहे ते घर बांधण्यास घेतील. परंतु एक त्यांच्यासाठी दु:खद बातमी अशी आहे की, सिमेंटच्या दरात वाढ झाली आहे. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, भारतीय स्टील कंपन्या लवकरच स्टीलच्या किंमती वाढवू शकतात. कोकिंग कोळशाच्या दर वाढीमुळे स्टील कंपन्यांना मोठा खर्च सहन करावा लागत आहे. रिपोर्टनुसार, स्टील कंपन्या डिसेंबरपर्यंत दरवाढीची घोषणा करू शकतात. स्टीलचे दर प्रति मेट्रिक टन २५ ते ५० डॉलर किंवा प्रति मेट्रिक टन 2 ते 4 हजार रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे.
सळईच्या किंमतीत 12 टक्क्यांची वाढ
मिळालेल्या काही माहितीनुसार, काही स्टील कंपन्यांनी किंमती वाढवण्यास सुरुवात केली आहे. कंपन्यांनी हॉट रोल्ड आणि कोल्ड रोल्ड उत्पादनांच्या किंमतीत सुमारे 12 ते 24डॉलर प्रति टन म्हणजेच 2000 रुपयांची वाढ केली आहे. आता पोलादाच्या किमती वाढल्या तर स्टीलरॉडच्या किमतीही तेवढ्याच प्रमाणात वाढणे स्वाभाविक आहे. याचा थेट परिणाम घरबांधणीच्या खर्चावर होणार आहे.
सिमेंटचे दरही गगनाला भिडले
सिमेंटच्या किमती देखील गगनाला भिडल्या आहेत. ब्रोकरेज फर्म जेफरीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबर आणि ऑगस्टमध्ये सिमेंटच्या किमती तब्बल 4 टक्क्यांनी वाढल्या आहेत. सप्टेंबर अखेर गोणीमागे 50 ते 55 रुपयांनी वाढ झाली आहे.