अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2022 :- वाद झाल्यामुळे शिक्षक (गुरूजी) पतीपासून अलिप्त राहणार्या पत्नीबरोबर शिक्षक पतीनेच अनैसर्गिक कृत केल्याची घटना समोर आली.
याप्रकरणी येथील तोफखाना पोलीस ठाण्यात शिक्षक पतीविरूध्द अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित पत्नीने फिर्याद दिली आहे.
फिर्यादी या मुळच्या जामखेड तालुक्यातील रहिवासी असून त्या सध्या अहमदनगर शहरातील एका उपनगरात राहतात. त्या एका खासगी रूग्णालयात नोकरी करत आहे.
जामखेड तालुक्यातील एका जिल्हा परिषद वस्ती शाळेतील शिक्षकासोबत त्यांची ओळख होती. ओळखीतून त्यांनी 18 जुलै 2018 रोजी लग्न केले होते.
लग्नानंतर तो शिक्षक पती फिर्यादी यांना त्रास देत असल्याने त्या जामखेड सोडून अहमदनगर शहरात राहण्यासाठी आल्या होत्या. त्या शिक्षकाने त्यांचा पत्ता शोधून त्या राहत असलेल्या अहमदनगर शहरातील त्यांच्या रूमवर ये-जा वाढविली.
18 जानेवारी 2022 रोजी शिक्षक पतीने तिच्या रूमवर येत तिच्यासोबत अनैसर्गिक अत्याचार केला. झालेल्या घटनेमुळे घाबरलेल्या पीडिताने पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे तक्रार अर्ज दिला होता.
या तक्रार अर्जावरून तोफखाना पोलिसांनी पीडितेचा पतीविरूध्द अत्याचाराचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास तोफखाना पोलीस करीत आहे.