अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2021 :-आपल्या वादग्रस्त विधान आणि बिनधास्तपणा यासाठी अभिनेत्री राखी सावंत ही नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी असते.
मात्र याच राखीवर आज दुःखाचे डोंगर कोसळेल आहे. राखीच्या आईला कर्करोग झाल्याचं निदान झालं असून ती या आजाराशी हिंमतीने लढा देत आहे.
राखीने सोशल मीडियावर तिच्या आईचे दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये राखीच्या आईला किती वेदना होत असतील याची जाणीव नक्कीच होते.
राखीने आईचे फोटो शेअर करत म्हटलं की, ‘कृपया माझ्या आईसाठी प्रार्थना करा, तिचे कर्करोगावर उपचार सुरू आहेत.’
अशी बातमी आहे की राखीची आई जया यांच्या पित्ताशयात खूप मोठी गाठ होती. या गाठीचा तपास केल्यानंतर ती कर्करोगाची गाठ असल्याचं निदान समोर आलं होतं.
यानंतर तातडीने त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. ‘बिग बॉस १४’च्या अंतिम फेरीपर्यंत राखी पोहोचली होती.
मात्र अंतिम फेरीत १४ लाख रुपयांची ऑफर स्वीकारत तिने स्पर्धेतून माघार घेतली. राखीने हे १४ लाख रुपये का स्वीकारले,
यामागचं कारण तिने अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले. आईच्या उपचारासाठी तिने स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला होता.
दरम्यान, बिग बॉसच्या फॅमिली वीक टास्कमध्ये राखी आणि तिच्या आईची व्हिडिओ कॉलद्वारे भेट झाली.
त्यावेळी राखीच्या आईने तिच्यावर उपचार सुरू असून तिला खूपच त्रास होत असल्याचे राखीला सांगितले. आईची ही अवस्था पाहून राखीला अश्रू अनावर झाले होते.