धक्कादायक ! विद्यार्थिनीचे नग्न फोटो तिने ठेवले स्टेटसला

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 3 ऑगस्ट 2021 :- पुरुषाकडून महिलेवर अत्याचार व तिची बदनामी झाल्याचे प्रकार तुम्ही आजवर ऐकले असतील. मात्र एका तरुणीने चक्क दुसऱ्या एका तरुणीची अब्रू चव्हाट्यावर आणली आहे. स्त्री जातीला कलंकित करणारी हि धक्कादायक घटना जिल्ह्यातील राहुरी शहरात घडली आहे.

दरम्यान या घटनेमुळे राहुरी शहरात एकच खळबळ उडाली आहे. राहुरी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात राहणाऱ्या 18 वर्षे वयाच्या एका तरुण विद्यार्थिनीचे नग्न फोटो, व्हिडिओ, वअश्लील चॅटिंग यांचे स्टेटस दुसऱ्या एका तरुणीने ठेवल्याने तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी तरुणीने पीडित 18 वर्षे वयाच्या विद्यार्थिनीचे नग्न फोटो, व्हिडिओ,व अश्लील चॅटिंग यांचे स्वतःच्या मोबाईल वर स्टेटस ठेवून त्याचे सार्वजनिकरित्या प्रसारण केले. त्यामुळे पीडित तरुणी व तिच्या परिवाराची समाजात बदनामी झाली आहे.

दरम्यान धक्कादायकबाब म्हणजे संबंधित कृत्य करणाऱ्या आरोपी तरुणीने अनेक वेळा असा प्रकार केला होता. यामुळे शेवटी पीडित तरुणीने राहुरी पोलीस ठाणे गाठून या आरोपी तरुणी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24