अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:-गेल्या काही दिवसांपासून नगर जिल्ह्यात आत्महत्या, हत्या अशा घटना घडू लागल्या आहेत.
तसेच अनेकदा अनोळखी मृतदेह आढळून येत असल्याने नगर जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यातच पुन्हा एकदा जिल्ह्यात एका उसाच्या शेतामध्ये अनोळखी महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी कि, नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव-बहिरवाडी शिव रस्त्यावरील शेतामध्ये अनोळखी महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली.
दरम्यान घटनास्थळी पोलीस पथक हजर झाले असून या महिलेची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. मात्र अद्याप या घटनेबाबत अधिक माहिती समजलेली नाही आहे.