अहमदनगर Live24 टीम, 28 एप्रिल 2021 :-नेवासा शहरातील प्रवरा नदीच्या किनारी असलेल्या गणपती घाट येथे तरुणाचा मृतदेह आज सकाळी पाण्यावर तरंगताना आढळून आला आहे.
या घटनेने नेवासा शहरात खळबळ उडाली आहे. दरम्यान याबाबत अधिक समजलेली माहिती अशी कि,
सदर मृत तरुण हा नेवासा शहरातील कोर्ट गल्ली परिसरातील असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे.
दरम्यान या घटनेची माहिती समजताच घटनास्थळी तातडीने पोलीस निरीक्षक करे यांनी भेट दिली. तसेच सहायक पोलीस निरीक्षक विजय ठाकूर,
पोलीस हवालदार तुळशीराम गिते, अशोक कुदळे, दिलीप कुऱ्हाडे यांनी मृतदेह पुढील कारवाईसाठी ग्रामीण रुग्णालय नेवासा फाटा येथे पाठवण्यात आला आहे.