धक्कादायक ! या ठिकाणी मृतदेह आढळून आला

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 10 फेब्रुवारी 2021:- नदीपात्रात अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान हि घटना नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे मुस्लीम कब्रस्थानाजवळ घडली आहे.

याप्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, अवधूत देविदास लोळगे रा. प्रवरासंगम यांनी खबर दिली असून

त्यात म्हटले की, 8 फेब्रुवारी रोजी दुपारी दीड च्या सुमारास प्रवरासंगम येथे पंचशील हॉटेलच्या उत्तरेस मुस्लिम धर्मियांच्या कब्रस्थानाजवळ जायकवाडी धरणाच्या बॅकवॉटरचे डबक्यामध्ये साचलेल्या पाण्यात एक अनोळखी 25 ते 30 वर्षे वयाच्या युवकाचा मृतदेह आढळून आला.

त्याच्या उजवा हाताच्या कोपरावर व छातीवर इंग्रजीमध्ये देवदास नाव गोंदलेले आहे. याबाबत नेवासा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24